जातीयवादी पक्षांशी आमची लढाई

Foto
 काँग्रेस शहराध्यक्ष उस्मानींचा दावा
काँग्रेसने सर्वच्या सर्व 115 वर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीचे नेते याबाबत निर्णय घेतील, मात्र सध्या तरी आमची लढाई एमआयएम, भाजपसह जातीवादी पक्षांची असल्याचा दावा काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केला. शिवसेनाही जातीयवादी पक्ष आहे का, या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले.
शिवसेनेसोबत सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस आता मवाळ झाली आहे. भाजप- एमआयएम या पक्षांवर जातीयवादी असल्याची टीका काँग्रेस नेते करतात. मात्र शिवसेनेनेबाबत चकार शब्द बोलायला तयार नाहीत. शहरात अध्यक्षपदाची नव्याने सूत्रे घेतलेल्या हिशाम उस्मानी यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने 115 वार्डवर तयारी सुरू केल्याचे सांगितले. गांधी भवनाचे नूतनीकरण पंधरा दिवसात पूर्ण झाल्यानंतर बैठकांचा सिलसिला सुरू होईल. सध्या तरी काँग्रेस संपूर्ण शहरात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात करीत असल्याचे ते म्हणाले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker